40 हजारांची लाच भोवली : नाशिकमधील राज्य कर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
40 thousand bribe : State tax officer in Nashik in ACB’s net नाशिक : चित्रीकरणासाठी आलेली वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात 40 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना वस्तू व सेवा कर कार्यालयाचे राज्य कर अधिकारी जगदीश सुधाकर पाटील (39, फ्लॅट नंबर 902, एफ विंग, अनमोल नयनतारा सिटी दोन, फेज-2, कर्मयोगी नगर, नाशिक) यांना सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.
असे आहे लाच प्रकरसण
तक्रारदार पुरूषांचा जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय आहे. जाहिरात चित्रीकरणाचे कामात व्यत्यय येऊन तक्रारदार यांचे पाच ते सहा लाखाचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून चित्रीकरणासाठी आलेली वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी राज्य कर अधिकारी जगदीश सुधाकर पाटील याने सोमवारी 40 हजारांची लाच मागितल्याने तक्रार नोंदवण्यात आली व लाच रक्कम स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.








