गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली असती तर महाराष्ट्र पेटला नसता
If Home Minister Devendra Fadnavis had apologized, Maharashtra would not have caught fire जळगाव : जालन्यातील अमानुष लाठीहल्ल्याला गृहखाते जवाबदार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच माफी मागितली असती तर महाराष्ट्र पेटला नसता, असा टोला आमदार एकनाथराव खडसे यांनी लगावला आहे. जालन्यातील एसपींनी यापूर्वीच वरीष्ठांच्या आदेशाने लाठीहल्ला केल्याचे स्पष्ट केल्याने हे वरीष्ठ कोण? असा प्रश्न खडसेंनी जळगावात उपस्थित केला.
फडणविसांनी माफी मागण्याचे सवय करावी
देवेंद्र फडणवीसांनी खरे तर आता माफी मागण्याची सवय केली पाहिजे, असेही आमदार खडसे म्हणाले. धनगर समाज, ओबीसी, राजपूत, ठाकूर आदी समाजांनाही अद्यापही न्याय मिळाला नसल्याचे आमदार खडसे म्हणाले. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना कुठलेही विशेषाधिकार आहेत? हे सिद्ध त्यांनी करावे, असे टिकेचे बाणही खडसेंनी चालवले.

