भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतची हत्या : आरोपी निलेश ठाकूरला पुन्हा दोन दिवसांची कोठडी
Murder of notorious criminal Nikhil Rajput in Bhusawal: Accused Nilesh Thakur remanded in custody for two days भुसावळ : भुसावळातील कुविख्यात गुंड निखील राजपूत याची कौटुंबिक वादासह अनैतिक संबंधाताला कंटाळून त्याचा शालक निलेश ठाकूर याने चाकूचे वार करीत रविवारी पहाटे श्रीराम नगरातील पाण्याच्या टाकीवर हत्या केली होती. हत्येप्रकरणी आरोपी निलेश ठाकूर यास अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयाने त्यास एका दिवसाची कोठडी सुनावल्यानंतर सोमवारी त्यास अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची अर्थात 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बहिणीशी प्रेमविवाह मात्र दुसरीशी घरोबा केल्याचा राग अनावर
पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असलेल्या निखीलने भाग्यशी या तरुणीशी पाच वर्षांपूर्वीच प्रेमविवाह केला मात्र बाहेरील एका स्त्रीसोबत अनैतिक संबंध बनवत तिच्यासोबत संसार थाटल्याची बाब निखीलचा शालक निलेश ठाकूर याला खटकत असल्याने त्यांच्यात सातत्याने वाद सुरू होते व त्यातून शनिवारी मध्यरात्री निलेशने भुसावळातील श्रीराम नगरातील पाण्याच्या टाकीवर झोपलेल्या निखीलवर झोपलेल्या अवस्थेत चाकूचे सपासप वार करीत त्याची हत्या केली. बाजारपेठ पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या. संशयिताला रविवारी न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर सोमवारी त्यास सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

आरोपीकडून चाकू जप्त
दरम्यान, आरोपीने गुन्ह्यातील चाकू महामार्गावरील अंडरपासजवळून काढून दिला. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.
