मराठा आरक्षण : मनोज पाटील-जरांगेंची प्रकृती खालावली
Maratha reservation : Manoj Patil-Jarange’s condition deteriorated
जालना : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असललेया जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणकर्ते मनोज पाटील जरांगे पाटील यांची प्रकृती काहीशी खालावल्याने त्यांना डॉक्टरांनी सलाईन लावली आहे. जरांगे उपोषणावर ठाम असून चार दिवसांत जीआर न निघाल्यास पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा जरांगी यांनी दिला आहे.
उपोषण मागे न घेण्याचा निर्धार
शासनाला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. आणखी वेळ कशाला पाहिजे. चार दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी राज्य शासनाच्या शिष्टमंडळासमोर मांडली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती काहीशी खालावताच डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावीली. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची वार्ता पसरल्याने जालना, औरंगाबादसह आजपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे यायला निघाले आहेत. यामुळे गावात मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्याचे अतिरीक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बुधवारी सकाळी जरांगे यांची अचानक भेट घेतली आणि विचारपूस केली. आंदोलकांनाही शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



