भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाच्या फर्निचरसाठी पाच कोटींचा निधी मंजूर
Five crores sanctioned for furniture of Bhusawal Additional Sessions Court भुसावळ : कनिष्ठ न्यायालयामध्ये 2014 पासून अतिरीक्त सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू झाले असनू यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. या इमारतीमधील लागणार्या फर्निचरसाठी राज्य शासनाकडून पाच कोटी 14 लाख 32 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. त्या निधीतूनच आता न्यायालयाच्या इमारतीत फर्निचर तयार केले जाणार आहे, अशी माहिती वकील संघाचे अध्यक्ष अॅड.तुषार पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परीषदेत दिली. अॅड.पाटील यांच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी पत्रकार परषदेचे आयोजन करण्यात आले.
आमदार सावकारे यांचा शासन स्तरावर पाठपुरावा
अॅड.पाटील म्हणाले की, अतिरीक्त सत्र न्यायालयाच्या दुसर्या व तिसर्या मजल्यासाठी 11 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झालेला होता, त्या निधीमधून अतिरीक्त सत्र न्यायालयाच्या दोन मजली इमारती बांधून त्यांचे काम पूर्ण करण्यात आले. या अतिरीक्त सत्र न्यायालयाच्या फर्निचरसाठी राज्य सरकारकडून पाचकोटी 14 लाख 32 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार संजय सावकारे यांनी शासनस्तरावर प्रयत्न केल्याचे त्यांनी पत्रकार परीषदेमध्ये सांगितले. लवकरच या इमारतीमधील फर्निचरचे काम पूर्ण होऊन हे दोन्ही मजले अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या कामकाजासाठी वापरले जातील. वकील संघाचे अध्यक्ष अॅड.तुषार पाटील, अॅड.धनराज मगर, अॅड.राजेश कोबीड, अॅड.पुरुषोत्तम पाटील, अॅड.जास्वंदी भंडारी, अॅड.विश्वंभर वाणी उपस्थित होते.

