आमदारांसह सर्व तालुका प्रशासन आले तिरपोळेकरांच्या दारी
आमदार आपल्या दारी अभियानात तिरपोळे येथे 432 लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ : आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तिरपोळे, ता.चाळीसगाव : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी चिरीमिरी, मध्यस्तच लागतो अशी नकारात्मक भावना नागरीकांमध्ये सरकार आणि प्रशासन याविषयी असते त्यामुळे अनेक सहज मिळणार्या योजनांचा लाभ घेण्यापासून लाभार्थी वंचित राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील शेवटच्या वंचित घटकाला शासकीय योजनांचा लाभ त्याच्या दारी जाऊन देण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी, शासकीय योजना पोहोचतील घरोघरी’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते तिरपोळे येथे आयोजित आमदार आपल्या दारी अभियान शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी चाळीसगावचे प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, वीज वितरण कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे, अप्पर तहसीलदार भारकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, बाजार समिती सभापती कपिल पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.भारती पंडित, तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे, सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास माळी, नायब तहसीलदार धनराळे, लाडवंजारी साहेब, वीज वितरण कंपनीचे अभियंता राउत साहेब, तिरपोळे गावाचे सरपंच राजू चव्हाण, बुथप्रमुख उदयसिंग राजपूत, सुनील राजपूत, गणेश सूर्यवंशी, जुलाल पाटील, माजी उपसरपंच किरण पाटील, पोलीस पाटील शेखर पाटील, जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शालिग्राम पाटील व शिक्षक वृंद, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, किशोर पाटील, शुभम साळुंखे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

432 लाभार्थींना योजनांचा लाभ
चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून 7 सप्टेंबर रोजी तिरपोळे नवेगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित आमदार आपल्या दारी या कार्यक्रमात 432 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच तिरपोळे येथे अश्या पद्धतीने ग्रामस्थांच्या दारी येऊन एकाच दिवसात योजनेचा लाभ दिला गेल्याने ग्रामस्थांनी आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले.
45 आदिवासी भिल्ल कुटुंबांच्या घरात पहिल्यांदा पडणार विजेचा प्रकाश
तिरपोळे नवेगाव येथील आदिवासी भिल्ल कुटुंबांना वीज कनेक्शन नसल्याने अंधारात आपले जीवन जगावे लागत होते, याबाबत काही दिवसांपूर्वीच तेथील महिलांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांची त्यांच्या चाळीसगाव येथील कार्यालयात भेट घेतली होती. त्यावेळी तुमच्या वीज कनेक्शनसह इतरही योजनांच्या बाबतीत 7 सप्टेंबर रोजी शिबीर आयोजित करून लाभ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी आपला दिलेला शब्द पाळत सर्व प्रशासकीय यंत्रणा सोबत घेत तिरपोळे येथे ‘आमदार आपल्या दारी अभियानाचे आयोजन केले त्यात. त्यात वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून 45 लाभार्थ्यांना नवीन वीज कनेक्शन मंजूर करण्यात आले, त्यापैकी 3 लाभार्थ्यांना तात्काळ वीज मीटर देण्यात आल्याने या आदिवासी भिल्ल कुटुंबांच्या घरात पहिल्यांदा विजेचा प्रकाश पडणार आहे.
अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देणार : प्रांताधिकारी हिले
आमदार मंगेश चव्हाण यांची ‘आमदार आपल्या दारी संकल्पना अभिनव असून लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट त्यांच्या गावातच एकाच ठिकाणी एकाच दिवसात लाभ मिळत असल्याने वेळेची आणि आर्थिक बचत होते, तसेच शासनाच्या विविध विभागांचा यामाध्यमातून समन्वय घडतो आणि प्रशासनावरील कामाचा भार देखील कमी होतो. सदर अभियानाचा हा पहिलाच दिवस असून यात अजून सुधारणा करून इतर गावांमध्ये व्यापक प्रमाणात हे अभियान राबविले जाईल, त्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती प्रांताधिकारी प्रमोद दिले यांनी यावेळी दिली.
- तिरपोळे येथे आयोजित आमदार आपल्या दारी अभियानात प्रत्यक्ष लाभ मिळालेले योजनानिहाय लाभार्थी पुढीलप्रमाणे
1 – नवीन वीज कनेक्शन – 45 पैकी 3 लाभार्थ्यांना जागेवर तसेच उर्वरित लाभार्थ्यांना 3 दिवसाच्या आत नवीन वीज कनेक्शन मिळणार
2 – फाटलेले / हरवलेले रेशनकार्ड नवीन बनवून देणे – पिवळे व केशरी 90
3 – रेशनकार्ड नाव वाढवणे – 27
4 – केंद्र शासनाचे ई श्रम कार्ड – 56
5 – उत्पन्नाचे दाखले – 27
6 – दारिद्र्य रेषा बी पी एल दाखले – 37
7 – नमुना क्र.8 जागेचा / घराचा उतारा – 57
8 – संजय गांधी निराधार पगार प्रकरणे – 23
9 – श्रावणबाळ योजना प्रकरणे – 10
10 – आभा कार्ड – 27
11 – वैद्यकीय दाखले – 33
नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेंतर्गत 4 कोटी 95 लाखांचे अनुदान वितरीत
तिरपोळे गावामध्ये कृषी विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा योजनेअंतर्गत एकूण 345 लाभार्थ्यांना ठिबक सिंचन, इलेक्ट्रिक मोटार, पीव्हीसी पाईप, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, मृद व जलसंधारण कामे, शेडनेट व पॉलिहाऊस, तसेच शेडनेट व पॉलिहाऊस मधील लागवड साहित्य या सर्व बाबींकरिता 4 कोटी 95 लाख इतक्या रक्कमेचे अनुदान कृषी विभागा मार्फत संबधीत लाभार्थींच्या खात्यात अदा करण्यात आलेले आहे.
