रावेर शहरवासीयांनी शंभर टक्के पाळला बंद


रावेर : रावेर शहरवासीयांनी शंभर टक्के बंद पाळला. छोरीया मार्केटपासून शेकडो कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपूर्ण केल्यानंतर ते तहसील कार्यालयात आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मोर्चात रावेर संयोजक नितीन गाढे, कामगार नेते दिलीप कांबळे, निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर, एम.आय.एमचे शेख वसीम, मुस्लीम पंच कमिटीचे शेर्खें गयास शेख रशीद, मौलाना हाफीज मुरतुजा यानी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी मुस्लीम पंच कमिटीचे शेख गयास शे.रशीद, युसूफ खान, डॉ. शेख शब्बीर, नगरसेवक आसीफ मोहमंद, जमायते इस्लामी हिंदचे शफीउद्दीन शेख् कासम, युसुफ खा इब्राहीम खा, माजी नगरसेवक महेंद्र गजरे, नगरसेवक सादिक, नगरसेवक असदउल्लाखान, प्रदीप सपकाळे, संविधान जागर समितीचे साहेबराव वानखेडे, निळे निशाणचे धुमाभाऊ तायडे, उमेश गाढे, पिंटू वाघ, संतोष कोसोदे, सावण मेढे, चंद्रकांत गाढे, दीपक तायडे, सुनील शिरतुरे, बसपाचे ईश्वर जाधव, संतोष ढिवरे, शेख कालुभाई आदी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !