भुसावळातील सात घरफोड्यांची उकल : चौकडी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

बाजारपेठ पोलिसांची मोठी कामगिरी : दोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त


Seven house burglaries in Bhusawal solved : Chaukdi market in police net भुसावळ : शहरात सातत्याने होणार्‍या चोर्‍या-घरफोड्यांमुळे नागरीकांमध्ये भीती पसरली असतानाच बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक चोरट्यांच्या चौकडीला बेड्या ठोकल्या आहेत. अट्टल आरोपींनी बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील सहा तर तालुका हद्दीतील एका घरफोडीची कबुली दिली आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन लाख सहा हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे, मोबाईल फोन, गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. दरम्यान, संशयितासोबत एका अल्पवयीन बालकालाही ताब्यात घेण्यात आले असून अटकेतील चौघांपैकी दोघांविरोधात यापूर्वीही चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.







मुस्लीम कॉलनी परीसरातील सहा घरफोड्या उघडकीस
बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील खडका रोड भागातील मुस्लीम कॉलनी व परीसरात गेल्या काही महिन्यात बंद घरांना टार्गेट करीत लाखो रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला होता त्यामुळे रहिवासी धास्तावले होते. पोलीस अधीक्षकांसह पोलीस उपअधीक्षकांनी घरफोड्या उघडकीस आणण्याचे आदेश दिल्यानंतर बाजारपेठ पोलिसांच्या डीबी शाखेने संशयितांना गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेत बोलते केल्यानंतर त्यांनी बाजारपेठ हद्दीत तब्बल सहा घरफोड्या केल्याची कबुली तर भुसावळ तालुका पोलीस हद्दीतील एका घरफोडी केल्याचे सांगितले. बाजारपेठ हद्दीतील गुरनं.445/2023, 217/2023, 346/2023, 374/2023, 399/2023, 435/2023 तसेच तालुका हद्दीतील गुरनं.132/2023 ही घरफोडी केल्याची कबुली दिली.

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त : दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
शेख मुश्ताक शेख अनवर (23), सोहेल शेख अय्युब (18), आफताफ शेख समीउल्ला (22), जुबेर शेख कमरू (26) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तसेच अन्य एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेतील आरोपींकडून दोन लाख सहा हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे, मोबाईल, फोन तसेच गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. आरोपींपैकी दोघांची पार्श्वभूमीवर गुन्हेगारीची असून त्यांच्याविरोधात चोरीसह घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींना न्यायालयाने 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोली सनिरीक्षक हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार सुनील जोशी, हवालदार निलेश चौधरी, हवालदार यासीन पिंजारी, हवालदार उमाकांत पाटील, हवालदार रमण सुरळकर, हवालदार महेश चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, प्रशांत सोनार, अमर अढांगळे आदींच्या पथकाने केली.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !