भुसावळ शहरातील बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण : आमदार संजय सावकारे
रींग रोडला जोडणार्या रस्त्याचे भूमिपूजन : जमिनीचे भाव वाढण्याची आशा
Most of the roads in Bhusawal city have been completed : MLA Sanjay Savkare भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील रींग रोडला जोडणारा रस्ता 60 फुट रुंदीचा आहे. या रस्त्याच्या कामासाठी अधिक निधी आवश्यक असल्याने हे काम रखडले होते मात्र यासाठी आता 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. शहरातील बहुतांश सर्वच रस्त्यांची कामे आता पूर्ण होत आहे. विस्तारीत भागांतील रस्त्यांच्या कामांमुळे जमिनीचे भाव वाढतील, असे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.
प्रभाग एकमध्ये रस्ता कामाचे भूमिपूजन
प्रभाग क्रमांक एकमध्ये बुधवारी गोपाळनगर पोलीस चौकी ते रींग रोड रस्त्यांचे काँक्रीटीकरण कामाचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या रस्त्याच्या कामासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावास सुरू होता. या रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. या रस्त्याच्या कामाचे आमदार सावकारे यांच्याहस्ते नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी यावेळी माजी नगरसेविका प्रीतमा महाजन, सामाजिक कार्यकर्ते गिरीष महाजन, भाजपचे प्रदेश चिटणीस अजय भोळे, माजी नगरसेवक प्रमोद नेमाडे, युवराज लोणारी, अॅड.बोधराज चौधरी, अजय नागराणी, निक्की बतरा, सतीश सपकाळे, राजेंद्र आवटे, बापू महाजन, पुरुषोत्तम नारखडे, अनिरुध्द कुलकर्णी, अनिकेत पाटील, प्रा.धीरज पाटील, किरण कोलते, देवेंद्र वाणी, महेंद्रसिंग ठाकूर, दिनेश नेमाडे, कंत्राटदार विनय बढे, सुभाष भंगाळे, प्रवीण जावरे आदींसह सर्व माजी नगरसेवक, परीसरातील रहिवासी आदी उपस्थित होते.
