येरवडा कारागृहात कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीची आत्महत्या


The main accused in the Kopardi rape case committed suicide in Yerawada Jail पुणे : राज्यात गाजलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. जितेंद्र शिंदे असे मयत आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

येरवडा कारागृहात भल्या पहाटे खळबळ
महाराष्ट्राला हादरावून सोडणार्‍या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे हा येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना रविवारी पहाटे त्याने येरवडा कारागृहातील बराकमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कारागृहात पोलीस गस्तीवर गेले असताना जितेंद्र शिंदेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.







अल्पवयीनावर अत्याचार करीत केली हत्या
13 जुलै 2016 च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील जितेंद्र शिंदेसह तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !