यावल न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत 207 दाव्यांमध्ये निपटारा
नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने शहरवासीयांमधून संताप
Settlement of 207 claims in National Lok Adalat in Yaval Court यावल : यावल न्यायालयामध्ये शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी सह दाखल होण्यापूर्वीच्या 207 दाव्यांमध्ये तडजोडीने निर्णय घेत निपटारा करण्यात आला. यातून तब्बल 29.02 लाखांचा वसुल झाला. नगरपालिकेच्या थकबाकी वसुलीकरीता न्यायालयातून 720 जणांना नोटीस पाठवण्यात आली मात्र राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये थकबाकी वसुलीत तडजोड करण्याकरीता मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने निर्णय घेणे शक्य झाले नाही परीणामी न्यायालयात उपस्थित शहरवासीयांमधुन प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.
यांची लोकअदालतीला उपस्थिती
यावल येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या राष्ट्रीय लोक अदालतीत प्रथमवर्ग न्या.एस.बी.वाळके व अॅड.स्मिता विजय कवडीवाले यांच्या पॅनलसमोर वकील संघाचे अध्यक्ष अॅड.सिद्धार्थ लोंढे, अॅड.गोविंद बारी, अॅड.एस.जी.कवडीवाले, अॅड.ए.आर.सुरडकर, अॅड.एन.पी.पाटील, अॅड.डी.आर.बाविस्कर, एन.पी.मोरे, अॅड.खालीद शेख, अॅड.याकुब तडवी, अॅड.सुलताना तडवी, अॅड.ए.एम.कुलकर्णी, अॅड.नितीन चौधरी, अॅड.राजेश गडे, अॅड.रीयाज पटेल आदींच्या वतीने दाखल होण्यापूर्वीचे व फौजदारी आणि दिवाणी न्यायालयातील तीन हजार 891 प्रकरण ठेवण्यात आले. यापैकी 207 प्रकरणांचा निपटारा करीत 29 लाख दोन हजार 818 रुपयांचा दंड वसुल झाला. राष्ट्रीय लोकअदालतीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी तडजोडीकरीता उपस्थित नसल्याने न्यायालयात आलेल्या शहरातील नागरीकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. यशस्वीतेकरीता न्यायालयाच्या सहाय्यक अधीक्षक ए.यु.श्रावगी, लघूलेखक एस.एम.तेली, वरीष्ठ लिपिक सी.एम.झोपे, एस.आर.तडवी, एस.पी. राजपूत, जी.एस.लाड, ए.बी.बागुल, डी.ए.गावंडे, पी.डी.चौहान, एस.एस.झांबरे, डी.आर.पाटील, आर.एस.रायपुरे आदींनी परीश्रम घेतले.








