भाजपा पदवीधर प्रकोष्ठच्या तालुका संयोजकपदी प्रा.सीमा पाटील
Prof. Seema Patil as taluka coordinator of BJP graduate cell भुसावळ : भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संयोजक धनराज विसपुते यांच्या आदेशान्वये व जळगाव जिल्ह्याचे संयोजक कृतिका आफ्रे यांच्या शिफारशीनुसार भुसावळ तालुका स्तरावर पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. तालुका संयोजक पदाची जबाबदारी प्रा.सीमा धीरज पाटील यांना देण्यात आली. भुसावळ तालुका सहसंयोजक चंद्रशेखर पाटील, संपर्कप्रमुख श्रेयस इंगळे, सहसंपर्कप्रमुख नम्रता प्रशांत देवकर, सोशल मिडिया प्रमुख अमोल झटकार, प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार : प्रा.पाटील
पदवीधरांच्या रोजगाराचा प्रश्न अधिक महत्वाचा आहे. यापुढील काळात पदवीधरांना हाताला काम आणि योग्य दाम मिळावे, यासाठी आमची संपूर्ण कार्यकारणी काम करणार आहे, पदवीधर युवक -युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न भाजपा पदवीधर प्रकोष्ठच्या माध्यमातून करू, असे तालुका संयोजक प्रा.सीमा धीरज पाटील यांनी सांगितले. भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे व भाजपा पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच भुसावळ शहर पदवीधर प्रकोष्ठ पदाधिकार्यांच्या नियुक्ती करून भाजपाचे पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहे, असे ही प्रा.सीमा पाटील यांनी कळविले आहे.

