रमाकांत भालेराव व चारू भालेराव यांना आंतरराष्ट्रीय नृत्य रत्न पुरस्काराने सन्मान


Ramakant and Charu Bhalerao couple honored with International Dance Ratna Award
भुसावळ  :
ओरीसा येथील पुरी येथे 7 ते 10 दरम्यान झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत भुसावळ येथील नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीचे विद्यार्थी नुपूर भालेराव हिला लहान गटात कथक नृत्यात प्रथम क्रमांकाचे तसेच किंजल बार्‍हे हिस सेमी क्लासिकलमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारीतोषिक प्राप्त झाले. पारीतोषिक स्वरूपात स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

पुरस्कारानंतर अभिनंदनाचा वर्षाव
याच वेळी आयोजित आंतरराष्ट्रीय महोत्सवात रमाकांत भालेराव व चारू भालेराव यांनी कथक नृत्य प्रस्तुत केले. त्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय नृत्य रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. शाल, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरवण्यात आले. या महोत्सवात विविध देशांतील तसेच भारतातील अनेक राज्यातील कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अन्नपूर्णा थिएटर, पुरी येथे झालेल्या या कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या यशामुळे भालेराव कुटूंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !