दोघा स्वस्त धान्य दुकानदारांचा अपघाती मृत्यू
पुणे जिल्ह्यात अपघात : चाळीसगाव तालुक्यात शोककळा
चाळीसगाव : भरधाव ट्रकने दुचाकीला उडवल्याने झालेल्या अपघातात चाळीसगाव तालुक्यातील दोघा स्वस्त धान्य दुकानदारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी पुणे जिल्ह्यातील घोडगंगा साखर कारखान्यानजीक राहु गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. गोकुळ लक्ष्मण राठोड (45, रा. तळोंदे प्र.चा.) व शिवाजी बाबू चव्हाण (40, पाथरजे) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर तळोंदे प्र.चा आणि पाथरजे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्या, ऊस तोड कुटुंबियांना स्वस्त धान्य वाटप केल्यानंतर थम्ब आवश्यक असल्याने तो घेण्यासाठी दोघे दुकानदार पुणे जिल्ह्यातील म्हसोबा सहकारी साखर कारखान्यात गेले होते तर ओळखीच्या लोकांच्या दुचाकीने ठसे घेण्यासाठी जात असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
