चाळीसगावला ‘बैलाची सजावट’ अनुभवली चित्रप्रदर्शनातून : व्ही.एच.पटेल विद्यालयात उपक्रमः
घुंगरु, माथाटी, मुस्के, टाळ, टापर यांची घेतली माहिती
चाळीसगाव : शहरी भागात पुरणपोळी खाऊन पोळ्याचा सण एन्जाय केला जातो.मात्र शेती, बैलाचे राबणे, पोळ्याला त्याची केली जाणारी सजावट याची मोबाईल युगातील विद्यार्थ्यांना फारशी माहिती नसते. याच पार्श्वभूमीवर पोळ्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी बैल सजावट साहित्याचे चित्र प्रदर्शन व्ही. एच. पटेल प्राथ. विद्यालयात भरविण्यात आले. विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनाही चित्रप्रदर्शनातून बैलाची अनोखी सजावट अनुभवली. हा उपक्रम उपशिक्षक जिजाबराव वाघ यांनी राबविला. उद!घाटन मुख्याध्यापिका मंजूषा नानकर यांच्या हस्ते झाले.
यांचे उपक्रमासाठी सहकार्य
भारत हा कृषी प्रधान देश असला तरी, जागतिकीरणामुळे शहरीकरण वाढले असून ग्रामीण भागातील सण – उत्सव परंपरेसोबतच शेतीची मशागत करतांना लागणारे साहित्य प्राण्याची मदत याची माहिती शहरातील विद्यार्थ्यांना नसते. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळेही सामान्यज्ञान, आजुबाजूच्या परिसराच्या माहितीचा त्यांच्यात अभाव जाणवतो. हे लक्षात घेऊनच पोळा सण व बैल सजावटीचे साहित्य यांचे चित्रप्रदर्शन विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
यशस्वितेसाठी त्रिशला निकम, अनिल महाजन, मनिषा सैंदाणे, शर्वरी देशमुख, सचिन चव्हाण, अजयराव सोमवंशी, प्रशांत महाजन, स्मिता अमृतकार, दिपाली चौधरी, कविता साळुंखे, रेखा चौधरी, रंजना चौधरी, सचिन पाखले, रेश्मा स्वार, दत्तात्रय गवळी, रोहित चव्हाण यांनी सहकार्य केले.
बैल साजश्रृंगाविषयी कुतूहल
बैल सजविण्यासाठी लागणारे झूल, गेरु, बेगड, बाशिंग, मटाट्या, घुंगरु, टाळ, टापर बेरडी, मुस्के, माथाटी यासह शेती मशागतीसाठी लागणा-या वखर, लाकडी नांगर, डवरा, तिफण या साहित्याचाही चित्र प्रदर्शनात समावेश होता. इयत्ता 2 रीच्या विद्यार्थ्यांनी सजावटीच्या प्रत्येक साहित्याची माहिती थोडक्यात सांगितली. 350 विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहिले. यावेळी त्यांनी कुतूहलाने काही प्रश्नही विचारले. देवयानी धामणे, साई वाघ, अमित चौधरी, महेश वाघ, स्वामी आगोणे, मनस्वी बि-हारे या विद्यार्थ्यांनी माहिती दिली. उपक्रमाचे शाळा समितीचे सदस्य श्यामलाल कुमावत, जितेंद्र वाणी, योगेश करंकाळ यांनी कौतुक केले.


