जळगावातील मु.जे.महाविद्यालयातील तरुणाच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेप : अन्य पाच संशयित निर्दोष
Accused sentenced to life imprisonment in the case of murder of youth in Muj College in Jalgaon: Five other suspects acquitted जळगाव : जळगावातील मु.जे. महाविद्यालयाच्या पार्कींग झोनमध्ये दुचाकीला मागून दुसर्या दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून भावाचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुकेश मधुकर सपकाळे (आसोदा) या तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. खून प्रकरणता आरोपी किरण अशोक हटकर (24, रा. नेहरू नगर, जळगाव) याला जळगाव जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा बुधवारी सुनावली.
असे आहे हत्या प्रकरण
29 जून 2019 रोजी रोहित मधुकर सपकाळे (आसोदा, ता.जि.जळगाव) हा मु.जे.महाविद्यालयाच्या पार्कींग झोनमध्ये आल्यानंतर समोरून येणार्या दुचाकीने अचानक ब्रेक मारल्याने रोहितच्या दुचाकीला धक्का लागला. या कारणावरून रोहितशी काही तरूणांनी वाद घातला. त्यानंतर त्याच महाविद्यालयात रोहितचा भाऊ मुकेश मधुकर सपकाळे याला बोलावल्यानंतर मुकेश सपकाळे तिथे आला व भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत असतांना तरूणांनी दोन्ही भावांना मारहाण केली. यात किरण अशोक हटकर याने मुकेशच्या डोक्यावर व छातीवर चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू ओढवला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा घडल्यापासून संशयित आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी त्यांना पुण्यातून अटक केली होती. या गुन्ह्यात इच्छाराम पुंडलिक वाघोदे (24, रा. समतानगर), किरण अशोक हटकर (24, रा. नेहरुनगर, जळगाव), अरुण बळीराम सोनवणे (27, रा. समतानगर), मयूर अशोक माळी (22), समीर शरद सोनार (24, रा. फॉरेस्ट कॉलनी), तुषार प्रदीप नारखेडे (23, रा. यशवंत नगर) या संशयिाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हा खटला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायमुर्ती बी.एस.वावरे यांच्या न्यायालयात चालला. 30 साक्षीदार तपासण्यात आले. यात मयताचा भाऊ रोहित सपकाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश देवराज, पंच यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने साक्ष व पुराव्याअंती मुख्य आरोपी किरण हटकर याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इतर पाच संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी प्रभावी युक्तीवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी, नरेंद्र मोरे यांनी सहकार्य केले. आरोपींतर्फे अॅड.प्रकाश बी. पाटील यांनी काम पाहिले.








