योगेश्वर नगरातून तरूणाची दुचाकी लांबविली
जळगाव :: तालुक्यातील जुना खेडी रोडवरील योगेश्वर नगरातून तरूणाची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी पहाटे घडला. याप्रकरणी मंगळवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन सुभाष काळे (34, योगेश्वर नगर, जळगाव) हा खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवार, 9 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता पवन काळे याने त्याच्या मालकीची दुचाकी (एम.एच.19 एन .9649) त्याच्या घरासमोर पार्क केली मात्र मध्यरात्री चोरट्यांनी संधी साधली. रविवार, 10 सप्टेंबर रोजी दपहाटे 3 वाजेच्या सुमारास दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी शनीपेठ पोलीस अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अमोल विसपुते करीत आहे.








