तांबापुरा परीसरातून चहा विक्रेत्याची दुचाकी लांबविली


जळगाव : तांबापूरा परीसरातून चहा विक्रेत्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
दिलीप आत्माराम सोनवणे (43, तांबापुरा, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. चहा विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार, 9 सप्टेंबर रोजी रात्री त्यांनी त्यांची दुचाकी गल्लीतील सुभाष भगत यांच्या घरासमोर पार्कींगला लावली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याची घटना रविवारी 10 सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उघडकीला आली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी दुपारी 2 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार अल्ताफ पठाण करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !