भुसावळातील गडकरी नगरात वयोवृद्ध दाम्पत्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला : एक लाखांच्या रोकडसह सोनेही लूटले
Midnight attack on elderly couple in Gadkari Nagar in Bhusawal : One lakh cash and gold looted भुसावळ : शहरातील गडकरी नगरात वयोवृद्ध दाम्पत्यावर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दोन दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला करीत लाखो रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकार्यांनी घटनेनंतर धाव घेत पाहणी केली असून जखमी वयोवृद्धांना गोदावरी रुग्णालयात हलवले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास लूट
भुसावळ शहरातील गडकरी नगरात विजय कुलकर्णी (65) व त्यांच्या पत्नी माधवी कुलकर्णी (60) हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करीत दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला करीत मारहाण सुरू केल्याने दाम्पत्य रक्तबंबाळ झाले व कुटूंब दहशतीखाली आल्यानंतर दरोडेखोरांनी कपाटातील एक लाख रुपयांची रोकड तसेच सोने-चांदीचे दागिने लूटून पळ काढला.






मध्यरात्री पोलिसांची धाव
दाम्पत्यावरील हल्ल्यानंतर दरोडेखोर पसार झाल्यानंतर दाम्पत्याने आरडा-ओरड केल्यानंतर नागरीक जमा झाले. स्थानिक माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी लागलीच बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली. जखमी अवस्थेतील पती-पत्नीला तातडीने डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरोडेखोरांच्या आवाजाने रहिवासी जागे झाल्याने संशयित पसार झाल्याचे सांगण्यात आले.


