चाळीसगावात मेडिकल व्यावसायीकडे धाडसी घरफोडी : दोन लाखांचा ऐवज लांबवला
Daring burglary of a medical professional in Chalisgaon: compensation of two lakhs extended चाळीसगाव : शहरातील भडगाव रोडवरील बंद घरातून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिणे मिळून एक लाख 99 हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांच्या पथ्थ्यावर
यशवंत बाबूलाल बोरसे (54, भडगाव रोड, मारूती मंदिरासमोर, चाळीसगाव) यांचा मेडिकल व्यवसाय आहे. मंगळवार, 12 रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास बोरसे हे कुुटुंबियांसमवेत अमळनेर येथे गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली तर बुधवारी कुटुंबी सकाळी 9.40 वाजता घरी परतले असता घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.






हॉलमधील कपाटातील दागिणे व रोकड नसल्याने तातडीने पोलिसांना सूचित करण्यात आले. चोरट्यांनी एक लाख रुपये किंमतीचे 30 ग्रॅम वजनाची सोन्याचे मणी असलेली पोत, 49 हजार रुपये किंमतीचा 20 ग्रॅम वजनाचा सोन्याचा वेढा व रोख 50 हजार रुपये असा एकूण 1 लाख 99 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी यशवंत बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


