सैन्य दलात भरतीसाठी अपयश : देवळीतील तरुणाची आत्महत्या
Failure to join the Army : Suicide of a young man from Devli चाळीसगाव : सैन्य दलात भरतीसाठी प्रयत्न करूनदेखील अपयश येत असल्याने नैराश्येने ग्रासलेल्या 21 वर्षीय तरुणाने घरातच गळफास घेतला. ही घटना बुधवारी सकाळी चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथे घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राज अशोक पाटील (21) असे मयताचे नाव आहे.
नैराश्य वाढल्याने उचलले टोकाचे पाऊल
राज शिक्षण करून सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करीत होता मात्र त्यात अपयश येत असल्याने त्याला नैराश्येने ग्रासले होते. मंगळवार, 12 रोजी राज याने कुटुंबियासोबत जेवण केले व रात्री 11 वाजेच्या सुमारास तो आपल्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेला.
बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास राज याचे वडिल अशोक पाटील हे दुध काढण्याकरीता त्यास उठवण्यास वरच्या मजल्यावर गेले असता आत्महत्या केल्याचा प्रकार लक्षात आला.








