शिविगाळ होत असल्याच्या संशयातून एकावर अहिरेत प्राणघातक हल्ला


One was assaulted in Ahire on suspicion of abuse धरणगाव : आपल्यालाच शिविगाळ होत असल्याच्या संशयातून धरणगाव तालुक्यातील अहिरे येथे एकावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
कृष्णा कामचंद संदानशिव (66, अहिरे खु.) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 12 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अहिरे गावी त्यांच्या घरासमोर त्यांचा मुलगा व सुन यांच्यात किरकोळ वाद सुरू होता. सर्जेराज रघुनाथ संदानशिव, सुमित सर्जेराज संदानशिव अन्य दोन महिलांनी (सर्व रा.अहिरे ता.) यांना असा संशय आला की, सुरू असलेली शिवीगाळ त्यांनाच केली जात आहे. यावरून सुमित संदानशिव याने याने हातातील वीट कृष्णा संदानशिव यांच्यान तोंडावर मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तर इतरांनी देखील विटांनी हातावर तोडांवर, पायावर व डोक्यावर मारहाण केली. तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी धरणगाव पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक उध्दव ढमाळे करीत दोन संशयितांना अटक करण्यात आली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !