लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार : विवाहित पुरूषाविरोधात गुन्हा


Rape against a woman with the lure of marriage : A crime against a married man रावेर : लग्न करण्याच्या आमिषाने 30 वर्षीय महिलेवर सुमारे पाच वर्ष अत्याचार करण्यात आला तसेच लग्न झाले असल्याची बाब लपवून ठेवून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात निंभोरा पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाद्य

अत्याचार करीत केली मारहाण
रावेर तालुक्यातील एका गावाती संशयित रवींद्र श्रावण विचवे हा पिडीत महिलेच्या घरात भाडेकरू म्हणून वास्तव्यास होता. रवींद्रने त्याचे लग्न झाले असल्याचे लपवून पिडीतेसोबत गेल्या पाच वर्षापासून तर 14 सप्टेंबर 2023 पर्यंत वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवत लग्नाचे वचन देत महिलेची फसवणूक केली तसेच पीडीतेसह तिच्या मुलांना चापटा-बुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !