आयुवेर्दिक औषधीद्वारे मूलबाळ होण्याचा दावा करीत पावणेसात लाख लुटले : जालन्याच्या डॉक्टराविरोधात गुन्हा


Claiming to get a child through life-saving medicine, looted fifty-seven lakhs: case against doctor of Jalana रावेर  : मूलबाळ होण्यासाठी आपल्याकडे खात्रीलायक आयुर्वेदीक औषधी असल्याची थाप मारून रावेर तालुक्यातील पातोंडी येथील एकाची सहा लाख 69 हजारात फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जालना जिल्ह्यातील डॉ.राहुल पाटील उर्फ योगेश गोसावी (भोकरदन, जि.जालना) विरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वेळोवेळी उकळली रक्कम
रावेर तालुक्यातील पातोंडील गावातील 49 वर्षीय शेतकर्‍याला संशयित डॉ.राहुल पाटील उर्फ योगेश गोसावी (रा. भोकरदन जि. जालना) याने माझ्याकडे मूलबाळ होण्यासाठी खात्रीलायक आयुर्वेदीक औषध असल्याचा दावा केला तसेच या औषधमुळे तुमच्या पत्नीला मुलबाळ होईल, असे बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर औषधी देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून वेळेवेळी तब्बल सहा लाख 69 हजार रुपये पातोंडी, ता.रावेर व भुसावळ येथे उकळले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर डॉ.गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक ईश्वर चव्हाण करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !