खेडी खुर्दच्या वयोवृद्धेची विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या
An elderly woman of Khedi Khurd committed suicide by consuming poisonous medicine जळगाव : जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील 69 वर्षीय वयोवृद्धेने शेतातील तणनाशक सेवन करीत आत्महत्या केली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दुर्गाबाई भिकाजी सोनवणे (69, खेडी, ता.जि.जळगाव) असे मयताचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
दुर्गा भिकाजी सोनवणे (69) या परीवारासह खेडी खुर्द येथे वास्तव्याला होत्या. गुरुवार, 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांनी शेतात गवतावर मारणारे तणनाशक विषारी औषध सेवन केल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.








