धरणगाव तालुका हादरला : चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार
Dharangaon taluka shaken : Married woman raped at knifepoint धरणगाव : विवाहिता घरात स्वयंपाक करीत असताना तिला चाकूचा धाक दाखवत एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील एका गावात मंगळवार, 12 रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अत्याचारानंतर पतीवरही केला हल्ला
35 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, मंगळवार, 12 सप्टेंबर रोजी घरात स्वयंपाक करीत असतांना संशयीत रामजी कृष्णा संदानशिव हा त्याच्या घराच्या मागील दरवाज्याने घरात घुसला. यानंतर त्याने पीडीतेस चाकूचा धाक दाखवून बळजबरीने अत्याचार केला. पीडीतेने आरडाओरड केल्यानंतर पती व मुलगा असे धावत आल्यानंतर रामजी कृष्णा संदानशिव याने पीडीतेच्या पतीवर चाकूने दाढीवर, डोळ्याखाली, कपाळावर वार करुन जखमी केले. त्यानंतर घराच्या अंगणात रामजीचे वडील नामे कृष्णा कामचंद संदानशिव, प्रतिपाल कृष्णा संदानशिव अशांनी हातात लाकडी दांडा व कु-हाड घेवून पीडीतेच्या पतीला व मुलाला मारहाण करून जबर दुखापत केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहेत.








