खेडी फाट्यावर भरधाव दुचाकी झाडावर आदळून जळगावातील प्रौढाचा मृत्यू
An adult in Jalgaon died after a speeding two-wheeler hit a tree at the village fork जळगाव : भरधाव दुचाकी झाडाला धडकल्याने दुचाकीस्वार प्रौढाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार, 14 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता घडली. भानुदास गोपाळ जाधव (45, रा.संत मीराबाई नगर, पिंप्राळा परिसर, जळगाव) असे मृत प्रौढाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणा रस्त्यावरच्या खेडी फाट्यावर हा अपघात घडला.
नियंत्रण सुटल्याने दुचाकी धडकली
भानुदास जाधव हे संत मीराबाई नगरात कुटुंबासह वास्तव्याला होते. गुरुवार, 14 सप्टेंबर रोजी ते रात्री कानळदाकडे जाण्यासाठी घरातून दुचाकीने निघाले. रात्री 9 वाजेच्या सुमारास आव्हाणा रस्त्यावरच्या खेडी फाट्यावर त्यांचा दुचाकीवरचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी झाडाला जावून आदळली. यात जाधव यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती कुटुंबीयांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आक्रोश केला. यानंतर जाधव यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी जाधव यांना तपासणी अंती मृत घोषित केले.








