प्रेमसंबंधांच्या संशयातून सख्ख्या बहिणीलाच कुर्‍हाडीचे घाव घालून संपवले : सोयगाव तालुक्यात खळबळ


Sakhkhya’s sister killed with ax wounds due to suspicion of love affair : Excitement in Soygaon taluka
सोयगाव :
प्रेमसंबंधाच्या संशयातून दोघा भावांनी आपल्या सख्ख्या बहिणीची कुर्‍हाडीचे घाव घालून हत्या केली. ही घटना सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारातील शेतात घडली. या घटनेत चंद्रकला धोंडू बावस्कर (35, तोंडापूर) या महिलेचा मृत्यू झाला. खून प्रकरणी आई-वडिलांसह दोघा भावांविरोधात फर्दापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेतातच केली हत्या
शमीम शाह कासम शाह याचे शेत राक्षा (ता.सोयगाव) राक्षा शिवारात आहे. शमीम शनिवारी शेतात काम करत असताना तिथे चंद्रकलाबाई धावत आली. माझे भाऊ आई-वडील मला प्रेमसंबंधांच्या कारणावरून मारून टाकणार असल्याने मला वाचवा, कोठे तरी लपवा, अशी तिने शमीमला विनवणी केली. त्याने तिला बकर्‍याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले. त्याच वेळी तिचे भाऊ कृष्णा व शिवाजी यांनी तिच्यावर कुर्‍हाडीचे घाव घातले. यातच तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सर्वांनी शमीम यालाही मारहाण केली. शमीमने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत पळ काढत पोलीस स्थानक गाठले.







पहूर पोलिसांनी घेतली धाव
घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु ती हद्द फर्दापूर शिवारात असल्याने फर्दापूर पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. यानंतर शमीम शाह कासम शाह याच्या फिर्यादीवरून मृत तरुणीचे दोन भाऊ, आई, वडील यांच्यावर फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फर्दापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलवला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !