वंचित बहुजन युवा आघाडीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी बाळा पवार


Bala Pawar as Jalgaon district president of Vanchit Bahujan Yuva Aghadi भुसावळ : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.निलेश विश्वकर्मा, प्रदेश महासचिव राजेंद्रजी पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी बाळा पवार यांची निवड करण्यात आली. बाळा पवार हे वंचित बहुजन आघाडीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय असून नुकतीच त्यांच्या नियोजनाखाली फैजपूर येथे प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आदिवासी हक्क परीषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. परीषदेच्या यशस्वी आयोजनानंतर पक्षाकडून बाळा पवार यांची पुनश्च युवा जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली. या निवडीबद्दल बाळा पवार यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या युवा कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !