कुसूंबा गावातील 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या


19-year-old youth commits suicide in Kusumba village जळगाव : जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील 19 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही क्कादायक घटना रविवार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तेजस धोंडू पाटील (19, कुसुंबा, ता.जि.जळगाव) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे तेजस पाटील हा आई-वडील आणि लहान बहिण यांच्यासोबत वास्तव्याला होता. त्याच्या वडिलांचा गॅरेज व्यवसाय आहे.तेजसचे आयटीआय झाल्याने तो वडीलांना गॅरेजच्या व्यवसायात मदत करत होता. शनिवार, 16 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता तेजसने आईवडील आणि बहिण यांच्यासोबत जेवण केले आणि झोपण्यासाठी ते वरच्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीत गेला. दरम्यान, मध्यरात्री त्याने सुताची दोरीने छताला गळफास घेतला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.







एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
रविवारी सकाळी वडील धोंडू पाटील हे मुलाला उठविण्यासाठी गेले असता मुलाने गळफास घेतल्याचे पाहून त्यांचा धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणार्‍या ग्रामस्थांनी धाव घेतली. एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आले. खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी एकच गर्दी केली. घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस कॉन्स्टेबल सदाब सय्यद करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !