भुसावळ विभागातील आठ स्थानकावर सौर पॅनल : 160 किलोवॅट विजेचे होणार उत्पादन


भुसावळ  : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील आठ रेल्वे स्थानकावर सौर पॅनल बसवण्यात येत असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विजेची बचत होणार आहे. ऑगस्ट 2023 मध्ये 225 किलोवॅट क्षमतेचे सौर रूफटॉप प्लांट बसवून मध्य रेल्वेकडून हरीत उपक्रमाला चालना दिली जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ विभागातील आठ रेल्वे स्थानकांवर सौर पॅनल लावण्यात येत असून त्या माध्यमातून भुसावळ विभागात 160 किलोवॅट विजेचे उत्पादन होणार आहे.

विजेत होणार मोठी बचत
डीआरएम ईती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात हे काम केले जात आहे. विभागातील आठ रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे. या स्थानकांवर अक्षय उर्जा लावण्याची प्रक्रीया सुरू आहे. भुसावळ विभागातील नांदुरा- 10 किलोवॅट, बडनेरा- 20 किलो वॅट, गायगाव- 15, धुळे- 15, मूर्तिजापूर- 20, मांडवा- 10, बर्‍हाणपूर- 30, किलो वॅट, जळगाव- 30 किलोवॅट तसेच पुणे विभागातील चार रेल्वे स्थानकांवर 65 किलोवॅटचे सौर उर्जेवरील प्लांट लावले जात आहे. पुणे विभागातील पल्सी 15, किर्लोस्करवाडी 20, भिलवडी व वाल्हा प्रत्येकी 15 किलोवॅटचे प्लांट लावण्यात येत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !