नैसर्गिक आपत्तीत पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करा ; राजकारणात सहभाग दिसल्यास कारवाई

भुसावळात पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे : भुसावळात पोलीस पाटलांना प्रशिक्षण


Work shoulder-to-shoulder with the police in natural disasters; Action if found involved in politics भुसावळ : गावातील कायदा सुव्यवस्थेत पोलीस पाटलांची भूमिका अत्यंत मोलाची असते त्यामुळे त्यांनी गावातील कुठल्याही भांडण, वादात कुणाचीही बाजू घेऊ नये, तसे दिसल्यास संबंधित पोलीस पाटील यांचा अहवाल पोलिसांकडून प्रांताधिकारी यांच्याकडे सादर होईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिला. ते म्हणाले की, गावातील घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात अथवा बीट अंमलदारास रीपोर्टीग करावे, गावातील अकस्मात मृत्यूच्या प्रकरणात अजिबात हलगर्जीपणा करू नका, तत्काळ पोलिसांना माहिती खरी द्यावी, पोलीस पाटील यांनी नैसर्गिक आपत्तीत पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे, अशा उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पोलीस पाटलांच्या बैठकीत दिल्या.

यांची बैठकीला उपस्थिती
शहरातील प्रभाकर हॉलमध्ये रविावारी बोदवड, मुक्ताईनगर व भुसावळ तालुक्यातील पोलीस पाटलांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील होते. प्रभाकर हॉलमध्ये रविवारी सकाळी 10 वाजता भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यातील पोलीस पाटील यांना प्रशिक्षण देण्यात आले. व्यासपीठावर भुसावळ तहसीलदार निता लबडे, मुक्ताईनगर तहसीलदार निकेतन वाळे उपस्थित होते. बोदवड, मुक्ताईनगर व भुसावळ तालुक्यातील 130 पेक्षा जास्त पोलीस पाटील प्रशिक्षण वर्गाला उपस्थित होते. यात महिला पोलीस पाटील यांचाही समावेश होता.

गैरवर्तन केल्यास पोलीस पाटलांवरही गुन्हा
प्रांताधिकारी जितेंद्र पाटील म्हणाले की, पोलीस पाटील यांनी गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करावी तसेच गावात टोळी आहे का, त्या टोळीत कोण कोण आहे, त्यांचे उद्योग काय याची माहिती पोलिसांना व प्रशासनाला द्यावी, पोलीस पाटील यांनी गैरवर्तन केल्यास त्यांच्यावरही फौजदार गुन्हा दाखल होईल, असेही ते म्हणाले. हे पद मानाचे असून आपण त्यांची उंची अजून वाढवावी, गावातील माहिती पोलिस व महसूल प्रशासनाला देत जावी, असे करतांना गावातील राजकारणापासून आपण दूर रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !