लग्नाच्या आमिषाने जामनेर तालुक्यातील महिलेवर बलात्कार ; चाळीसगाव तालुक्यातील तरुणाविरोधात गुन्हा
Rape of a woman in Jamner taluka on the lure of marriage ; A crime against youth in Chalisgaon taluka जामनेर : लग्न करण्याच्या आमिषाने जामनेर तालुक्यातील 30 वर्षीय महिलेवर सुमारे एक वर्ष अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित दीपक उर्फ किशोर बाळू बेलदार (30, बेलदारवाडी, ता.चाळीसगाव) पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अत्याचार करीत केली मारहाण
जामनेर तालुक्यातील 30 वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, संशयित दीपक बेलदार याने मे 2022 ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान वाकोद व सुंदरनगर, ता.पुणे येथे नेत लग्नाच्या आमिषाने अत्याचार केला व दारूच्या नशेत शिविगाळ करीत मारहाण केली. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर महिलेने पहूर पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.








