पिंप्राळ्यातील कुविख्यात गुन्हेगार स्थानबद्ध


Notorious criminals located in Pimprala जळगाव : पिंप्राळ्यातील कुविख्यात गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. गणेश उर्फ नाना शांताराम कोळी (37) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या संशयीताचे नाव असून याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहे. संशयीताची ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

गावठी दारू विक्री करणारे आता पोलिसांच्या रडारवर
जळगाव शहरातील पिंप्राळा परीसरात गुन्हेगार गणेश कोळी हा रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्यांच्यावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे सात गुन्हे दाखल आहेत. तरी देखील त्याच्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी गणेश कोळी याच्यावर एमपीडीएची कारवाई करण्याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार अहवालाचे अवलोकन करून पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचवाजता एमपीडीए कायद्यांर्गत स्थानबध्द करण्याचे आदेश काढले. त्यानुसार रामानंद नगर पोलीसांना त्याला अटक करून ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले.







यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे, हवालदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, सुनील दामोदरे, राजेश चव्हाण, विजय खैरे, रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, इरफान मलीक आणि कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !