रेल्वेतून पडल्याने अकोल्यातील तरूणाचा मृत्यू : माहिजीजवळील घटना
Elderly man dies in Akola after falling from train : Incident near Mahiji जळगाव : माहिजी रेल्वेस्टेशन नजीक धावत्या रेल्वेतून पडल्याने राहुल चंद्रकांत गुप्ता (50, गोपीसदन, केडीया प्लॉट, अकोला) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता घडली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जळगाव लोहमार्ग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तोल गेल्याने रेल्वेतून पडून मृत्यू
जळगाव तालुक्यातील माहिजी रेल्वे स्थानक जवळील रेल्वे खंबा क्रमांक 385 / 13 जवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने राहूल गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला. . ही घटना बुधवार, 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली होती. याबाबत माहिजी रेल्वे स्टेशन प्रबंधक यांनी या घटनेची माहिती जळगाव रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. सुरूवातीला अनोळखी म्हणून लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली मात्र मयत तरुणाच्या खिशात जालना येथील रेल्वे स्टेशनचे प्लॅटफार्म टिकीट आढळून आले.






अखेर पटली ओळख
राहुल चंद्रकांत गुप्ता (50, गोपीसदन, केडीया प्लॉट, अकोला) असे मयताचे नाव निष्पन्न झाले. राहुल हा घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेला होता. त्यांची बहिण महिमा ललवाणी यांनी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेवून ओळख पटविली. त्यानुसार शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक हिरालाल चौधरी करीत आहेत.


