श्री सप्तश्रृंगी देवी मंदिरातून मूर्तीसह पादुका लांबवल्या
Shree Saptashringi Devi extended the paduka along with the idol from the temple जळगाव : जळगाव शहरातील प्रेमनगरातील श्री सप्तश्रृंगी मंदिरातून चोरट्यांनी देवी मूर्तीसह पितळी पादुका लांबवण्यात आल्या. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांचा मोर्चा मंदिरांकडे
जळगाव शहरातील प्रेमनगरात श्री सप्तश्रृंगी देवीचे मंदिर असून चोरट्यंनी या मंदीरातील पंचधातूची 25 हजार रुपये किंमतीची पंचधातूची देवीची मूर्ती आणि 900 रुपये किंमतीच्या पादूका अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या. हा प्रकार उघडकीस येताच मंदिराचे पूजारी भूषण किशोर जोशी यांनी बुधवार, 20 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपास हवालदार भारती देशमुख करीत आहे.








