गावठी कट्ट्यासह पुनगावातील दोघे तरुण जाळ्यात

पाचोरा पोलिसांची सलग दुसर्‍या दिवशी मोठी कारवाई


Two youths from Punagavati along with Gavathi Katta were caught in the net पाचोरा : गावठी कट्टा व जिवंत काडतूस पकडल्यानंतर पाचोरा पोलिसांनी दुसर्‍या दिवशी पुन्हा पूनगाव, ता.पाचोरा येथील तरुणांकडून गावठी कट्टा जप्त केल्याने अवैधरीत्या गावठी कट्टा बाळगणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली. राहुल अनिल परदेशी (27, पूनगाव, ता.पाचोरा) व रामचंद्र गोपीचंद परदेशी (34, पूनगाव, ता.पाचोरा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. ही कारवाई बुधवारी रात्री 11.30 वाजता करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पूनगावातील दोघा संशयितांकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा निरीक्षक राहुल खताळ यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुरेश पाटील, पोलीस हवालदार विश्वास देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल संदीप भोई, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे आदींच्या पथकाने महादेव मंदिराजवळील पोल्ट्री फार्मजवळ संशयीत येताच त्यांना अटक केली तसेच गावठी कट्टा जप्त केला. प्रकाश शिवदे यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !