राज्य सरकारच्या प्रस्तावीत कृषी कायद्यांला विरोध
यावल तालुका अॅग्रो डीलर असोसिएशनने कृषी मंत्र्यांना पाठवले पोस्टकार्ड
यावल : शहरातील फैजपूर रस्त्यावरील यावल तालुका अॅग्रो डीलर असोसिएशन कार्यालयात राज्य सरकारच्या प्रस्तावित कृषी कायद्यास विरोध करण्याकरीता संघटनेचे पदाधिकारी एकत्र जमले व प्रस्तावीत कायद्याचा निषेध नोंदवण्यात आला. असोसिएशनने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांना पोस्ट कार्ड लिहून राज्य सरकारच्या प्रस्तावीत कृषी कायद्यास विरोध दर्शवत निषेध केला.
तर नागपूरात आंदोलन
पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केलेल्या व पुढील अधिवेशनात प्रस्तावीत असलेल्या कृषी कायद्यांमध्ये चोर सोडून संन्याशाला फाशीसारखा प्रकार आहे. या कायद्यानुसार एमपीडीए सारख्या झोपडपट्टीतील गुंडांवर जी कारवाई होते ती कारवाई व तसे गुन्हे कृषी विक्रेत्यांवर नोंद होणार असल्याने या कायद्यास प्रचंड विरोध दर्शवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना राज्यभरातून पोस्ट कार्ड पाठवून विरोध दर्शवण्यााठी यावल तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशनतर्फे माफदा, पुणेचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट कार्ड लिहून तालुक्यातील कृषी विक्रेते बांधवांनी विरोध दर्शविला.

या कायद्यांना विरोध करण्यासाठी पोस्ट कार्ड मोहिमेनंतर तीन दिवसीय बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती मनोज वायकोळे यांनी दिली. हिवाळी अधिवेशनापूर्वी या कायद्यांबाबत कृषी विक्रेत्यांचे हित लक्षात न घेता कायदा होत असल्यास हिवाळी अधिवेशनावेळी राज्यभरातून सर्व 50 ते 70 हजार कृषी विक्रेते बांधव नागपूरात ठिय्या आंदोलन करतील, असे माफदा संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

