तोल गेला अन् जीवाला मुकला : कल्याणेहोळ गावात शोककळा
He lost his balance and lost his life : Mourning in Kalyanehol village धरणगाव : नदीपात्रात तोल जावून पडल्याने धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ येथील 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 20 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कल्पीत जगन्नाथ निकम (33, कल्याणेहोळ, ता.धरणगाव) असे मयताचे नाव आहे.
तोल जावून पडताच मृत्यू
कल्पीत निकम हा आपल्या परीवारासह धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ येथे वास्तव्याला होता. बुधवार, 20 सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास गावाच्या बाहेर असलेल्या नदीच्या किनार्याजवळून जात होता. त्यावेळी त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. त्यातच त्याचा बूडून मृत्यू झाला.








