मध्यप्रदेशातील तरुणाला खंडणीसाठी मारहाण करीत हलखेड्याच्या जंगलात लूटले : त्रिकूटाविरोधात गुन्हा
A youth from Madhya Pradesh was beaten for ransom and looted in the forest of Halkheda : Crime against the trio मुक्ताईनगर : नातेवाईकांसाठी औषधी घेण्यासाठीसाठी मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे आलेल्या मध्यप्रदेशातील तरुणाला खंडणीसाठी त्रिकूटाने मारहाण केली तसेच त्याच्याकडील तीन हजारांची रोकड व मोबाईल हिसकावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
असे आहे खंडणी प्रकरण
मध्यप्रदेशातील छिंडवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथील अमित हरेश बसकार (20) हा तरुण बुधवारी मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे कर्करोगाचे औषध घेण्यासाठी आला असता हलखेडा जंगलात त्रिकूटाने त्यास मारहाण केली तसेच त्याच्या खिशातील तीन हजारांची रोकड तसेच मोबाईल व बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपींनी अमितला ओलीस ठेवत त्याच्या भावाला मोबाईलवरून भावाला ओलीस ठेवल्याची माहिती दिली तसेच सुटका करण्यासाठी 50 हजारांची खंडणी मागितली.






तातडीने फिरली तपासचक्रे
लहानभावाला 50 हजारांसाठी डांबून ठेवल्याचा प्रकार मोठा भाऊ अनिकेतला कळताच त्याला मोठा धक्का बसला. त्याने तत्काळ अमरवाडा पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर यंत्रणेने छिंदवाड्याचे पोलीस अधीक्षक विनायक वर्मा यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली व त्यांनी ही बाब जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या कानावर टाकली. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे वेगात फिरवत खंडणी मागणार्याचा शोध घेण्यात आला.
एका आरोपीच्या बांधल्या मुसक्या
मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षकमनागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाी पोलिसांनी खंडणी मागणार्यांपैकी बरसेन भोसले यास अटक करण्यात आली तर दोघांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी अमित बसकार यांच्या फिर्यादीवरून बरसेन भोसले, नानसिंग पावरा व आशु पावरा (हलखेडा, ता.मुक्ताईनगर) यांच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.


