गैरकृत्य करण्यासाठी फायटर बाळगले : शहर पोलिसांकडून तिघांवर कारवाई


Carrying fighter to commit misdemeanor : Action against three by city police जळगाव : जळगाव शहरातील बळीराम पेठ परीसरातील त्रिकूटाच्या ताब्यातून पोलिसांनी तीक्ष्ण हत्यार, चॉपर व फायटर जप्त केले असून संशयितांना अटक करण्यात आली. शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

शस्त्राच्या धाकावर दहशत
जळगाव शहरातील टॉवर चौक ते बळीरापेठ मधील कारंजा चौकादरम्यान, काही तरुण परसरात दहशत माजविण्यासाठी धारदार चॉपर, फायटर व चाकू घेवून फिरत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांना संशयितांचा शोध घेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.







त्यानुसार पथकाने कारवाई करत बुधवार, 20 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता विशाल रवींद्र जयस्वाल (20, रा.लक्ष्मीनगर), सनी उर्फ निलेश बाजीराव तायडे (19, जैनाबाद) व हर्षल सुकदेव इंगळे (24, रा.जैनाबाद) या तिघांना ताब्यात घेतले. तिघांकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले. याप्रकरणी रतन गीते यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !