खेडीतील अट्टल गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार
जळगाव : जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावातील अट्टल गुन्हेगाराला जिल्ह्यात दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. संशयिताविरोधात तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत. भूषण रघुनाथ सपकाळे (32, खेडी खुर्द, ता. जळगाव) असे संशयिताचे नाव असून उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले आहेत.
जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील भूषण रघुनाथ सपकाळे याच्यावर शहर पोलीस ठाण्यासह तालुका पोलीस ठाण्यात 9 विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. संशयिताविरोधात वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली परंतु त्याच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. भूषण सपकाळे त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून तो पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला होता.








