शिर्डी हादरले : पत्नी, मेहुण्यासह तिघांची केली हत्या ; कारण वााचून बसेल धक्का


शिर्डी : पत्नी नेहमीच माहेरी राहत असल्याने तसेच सासुरवाडीतील लोकांशी असलेल्या रागातून संतप्त पतीने आपल्या चुलत भावाची मदत घेत आधी मेहुणा, नंतर पत्नी व आजेसासूची हत्या केली. या घटनेतन कुटुंबातील तिघे जखमी झाले असून बुधवारी मध्यरात्रीच्या या तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला. ही घटना शिर्डी तालुक्यातील सावळीविहिरमध्ये घडली.

आरोपी सुरेश विलास निकम (32, संगमनेर) व त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम (24) यांनी सावळीविहीर येथे सुरेशच्या सासुरवाडीला येताच दरवाजा ठोठावला व आजेसासू हिराबाई गायकवाड यांनी दरवाजा उघडताच त्यांच्यावर आरोपींनी प्रथम चाकूहल्ला केला. यानंतर आवाजाने जागे झालेल्या कुटुंबातील अन्य सदस्यांवरही आरोपींनी बेफाम चाकूहल्ला केला. मदतीला आलेल्या शेजार्‍यांना चाकूचा धाक दाखवून आरोपी पसार झाले.







पसार होण्यापूर्वीच ठोकल्या बेड्या
आरोपी सुरेश निकम व रोशन निकम परराज्यात पळण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास शिंदे टोलनाक्यावर पकडण्यात आले.

तिघांचा मृत्यू
चाकूहल्ल्यात आरोपीचा मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड (25), पत्नी वर्षा सुरेश निकम (24) व आजेसासू हिराबाई गायकवाड (70) यांचा मृत्यू झाला. आरोपीची सासू संगीता चांगदेव गायकवाड (45), सासरे चांगदेव गायकवाड (55) व मेहुणी योगिता महेंद्र जाधव (30) हे गंभीर जखमी झाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !