रावेर शहरात उद्या कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिर

जिल्ह्यातील तीन मंत्र्यांची शिबिराला उपस्थिती : खासदार रक्षा खडसे यांच्यातर्फे शिबिराचे आयोजन


Artificial organs and assistive devices distribution camp tomorrow in Raver city भुसावळ  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत भारत सरकारच्या एडीआयपी योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकारद्वारा तसेच खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिराचे शहरातील व्ही.एस.नाईक कॉलेजच्या प्रांगणात रविवारी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराला पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल भाईदास पाटील, खासदार रक्षा खडसे यांची उपस्थिती राहणार आहे. या शिबिरात केवळ रावेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. रावेर लोकसभा क्षेत्रातील अन्य तालुक्यात नंतर या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांनी शिबिराला येताना पूर्व नोंदणी पावती, आधारकार्ड व दोन पासपोर्ट फोटो आणावेत, असे आवाहन खासदारांच्या संपर्क कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !