रेल्वे गाड्यांना गर्दी : रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांच्या 212 फेर्‍यांच्या कालावधीत वाढ


Overcrowding of trains : Railway administration has increased the duration of 212 special trains भुसावळ : रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोईसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे 212 फेर्‍यांच्या विशेष गाड्यांचा भुसावळ विभागातून धावणार्‍या कालावधीत वाढ केल्याने प्रवाशांची जागेसाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे. या फेर्‍या रेल्वेतर्फे जानेवारी 2024 पर्यत वाढ करण्यात आली आहे.

रेल्वे प्रवाशांना दिलासा
रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. यामुळे प्रशासनाकडून धावणार्‍या रेल्वे गाड्यांचा कालावधीत वाढ केली आहे. यात रेल्वे गाडी (01025) दादर- बलिया त्रि-साप्ताहिक विशेष (34 फेर्‍या) 1 जानेवारी 2024 पर्यंत चालविण्यात येणार आहे. तसेच बलिया दादर या विशेष गाडीच्या (34) फेर्‍या 3 जानेवारीपर्यत वाढविण्यात आली आहे. तसेच दादर गोरखपूर (01027) दादर- गोरखपूर आठवड्यातून 4 दिवस विशेष (45 फेर्‍या) दि. 31 डिसेंबरपर्यत चालविण्यासाठी वाढवण्यात आली आहे. दरम्यान गोरखपूर दादर ही आठवड्यातून चार दिवस धावत असलेल्या विशेषगाडीच्या (45 फेर्‍या) वाढविल्या आहे. ही गाडी 2 जानेवारी 2024 पर्यत चालविली जाणार आहे.

(01139) ही नागपूर मडगाव द्वि साप्ताहिक विशेष गाडीच्या (26 फेर्‍या ) वाढविल्या आहे. ही गाडी 31 डिसेंबरपर्यत चालविली जाणार आहे. मडगाव नागपूर (01140) ही द्वि साप्ताहिक विशेष गाडीच्या (26 फेर्‍या) वाढविल्या आहे. ही गाडी दि. 31 डिसेंबरपर्यत चालविली जाणार आहे. विशेेष गाड्यांचे आरक्षण बुकींग रविवार, 24 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले असून प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !