इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने महिला डॉक्टरांचा विनयभंग


पाचोरा : टी-टी चे इंजेक्शन देण्यासाठी महिला डॉक्टरांसोबत बळजबरी करून विनयभंग केल्याप्रकरणी एकााविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी पीडीत डॉक्टरांचा नातेवाईक आहे.

असे आहे नेमके प्रकरण
पीडीत महिला डॉक्टरांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा नातेवाईक असलेल्या संदीप (नाव बदलेले) हा शनिवार, 23 सप्टेंबर रोजी साडेदहा वाजेच्या सुमारास दवाखान्यात आला व मला टी-टीचे इंजेक्शन देण्याचे सांगू लागला परंतु महिला डॉक्टरांनी टी-टी चे इंजेक्शन नाही. सरकारी दवाखान्यातून घ्या, असे सांगितल्यानंतर संशयीताचा कॅबीनचा दरवाजा उघडून बाहेर बघितले व पीडीतेस इंजेक्शन देण्यासाठी बळजबरी केली. महिला डॉक्टरने विरोध केला असता डावा हात पकडत अश्लिल संभाषण केले. यावेळीपीडीतेने आरडा-ओरड केली असता संदीप हा तेथून निघून गेला. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक पांडुरंग गोरबंजारा करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !