आयशरच्या धडकेने बहिण-भावाचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : भरधाव आयशरने दुचाकीला उडवल्यानंतर झालेल्या अपघातात बहिण-भावाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी इसारवाडी फाट्याजवळील गोविंदा हॉटेलसमोर घडला. या धडकेत भावासह गर्भवती बहीण गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचा शनिवारर मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने आयशर सोडून पळ काढला.
कुटूंबावर कोसळले संकट
पडेगावातील शेख निजाम यांची मुलगी मेरा बेगम ही वैजापूर येथे सासरी राहते. तिचे एक वर्षापूर्वी लग्न झाले असून, ती पाच महिन्यांची गर्भवती होती. शुक्रवारी सकाळी शेख सिराज शेख निजाम (22) हा बहिणीला घेण्यासाठी सासरी गेला होता. शेख सिराज आणि नमेरा बेगम शेख साबीर (20) हे दोघे दुचाकीने (एम.एच 20. एफ.क्यू.2127) पडेगावच्या दिशेने निघाले. इसारवाडी फाट्याजवळील हॉटेल गोविंदासमोर भरधाव आयशरने (एमएच 04 डीके 1533 ) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी अॅम्ब्युल्सने घाटीत दाखल अपघातानंतर केले. आयशर चालकाने वाहन सोडून पळ काढला.






गंभीर जखमी झालेला शेख सिराज आणि बहीण नमेरा साबीर शेख या दोघांवर घाटीतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा रात्री आठ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मयत शेख सिराज हा सेंट्रिंग काम करत होता. तो आई-वडिलांना एकुलता एक होता. एकुलत्या एक मुलासह मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


