दुसखेडा रेल्वे गेट ओलांडताना रेल्वेची धडक : दुसखेड्यातील दोघे जागीच ठार
Duskheda train collided while crossing the railway gate: Two from Duskheda were killed on the spot पाचोरा : पाचोरा तालुक्यातील दुसखेडा रेल्वे गेटवर कामायनीच्या धडकेने दोघे जण ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडल्याने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे. रत्नाबाई माधव पाटील (55, दुसखेडा), अशोक झेंडू पाटील (65, दुसखेडा) अशी मयतांची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे.
रेल्वे रूळ ओलांडताना दुर्घटना
परधाडे येथे हरीनाम सप्ताह असल्याने दुसखेडा गावाजवळील रेल्वे क्रॉसिंग ओलांडून सप्ताहासाठी काही महिला व पुरूष जात असताना त्याचवेळी अचानक रेल्वे आली व रेल्वेची धडक बसल्याने अशोक पाटील व रत्नाबाई पाटील यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पाचोरा पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवले असून या घटनेने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

