वरखेडेच्या विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह


The dead body of a married woman of Varkhede was found in a well चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील वरखेड बु.॥ येथील विवाहितेचा विहिरीत मृतदेह पळासरे येथील पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री उघडकीला आली. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कविता गोकुळ जगताप (21, वरखेड बुद्रुक, ता.चाळीसगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

आत्महत्या केल्याचा संशय
चाळीसगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथे कविता जगताप ही विवाहिता पती गोकुळ जगताप यांच्या सोबत वास्तव्यास होती. शनिवार, 23 सप्टेंबर रोजी रात्री त्या शौचास जावून येते, असे सांगून घराबाहेर पडली व त्यांचा सर्वत्र शोध असताना रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायती पळासरे पाणीपुरवठा विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात हलवला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक कुशल शिंपी करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !