हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात संततधार : आठ दरवाजे उघडले
Santatdhar in Hatnoor catchment area: Eight gates opened भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणात 85.13 टक्के जलसाठा कायम असून धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे तापी नदीला पूर आला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणात शनिवारी रात्री पूर्णा नदीतून पाण्याची आवक वाढताच रविवारी सकाळी नऊ वाजता सहा दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले तर सकाळी 11 वाजता पुन्हा दोन दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले. पूर नियंत्रण आराखड्यानुसार 10 ऑक्टोबरला 100 टक्के जलसाठा होईल. रविवारी धरणाचे आठ दरवाजे अडीच मिटरने उघडून प्रतीसेकंद 1406 क्युमेक्स अर्थात 49 हजार 653 क्युसेस वेगाने नदीपात्रात विसर्ग केला जात आहे.
